वाढदिवस आणि कॉवीड

 

आपला सगळ्यांचा वाढदिवस दरवर्षी येतोच नाही कायात काही नवल नाहीसकाळ उजाडली की मित्रांचेनातेवाईकांचे शुभेच्छा देणारेसंदेश आणि दूरध्वनी येण्याची सुरुवात होते आणि आजच्या इन्फॉर्मशन age च्या काळात तर ते आणखीच सरळ सोपे झाले आहे

जी मंडळी social मीडिया वर सदा तत्परटेक्नॉ सॅव्ही असतात उनके तो क्या कहने ? त्यांच्या वर , म्हणजे त्यांच्या अकाऊंट मधे तरमित्र मंडळी कडून आपल्या भावनाशुभ संदेश याचा भडीमार होत असावा

खर विचारलत तर मला नेहमी प्रश्ण पडायचा की सगळे वाढदिवस का साजरा करतातएवढ्या उत्साहाने ,काही मंडळी तर अगदीजल्लोष करुनयात आनंद वाटण्यासारखं काय आहेआपण या पृथ्वीतलावर आहोत या वर्षी सुध्दाअजूनहीयाची खुशी असावीबहुदा

तुम्हाला अगदी खर सांगतोमी सुध्धा माझ्या मनातलं असलं तत्व ज्ञानअसले विचार आपल्याजवळच ठेवून बरेच वेळा वाढदिवससाजरा केला आहेइंग्रजीत herd मेन्टॅलिटी म्हणतात बहुतेक ह्याला.

असोतर वाढदिवस उजाडला तुझाकिती वर्ष झाली आता रेटून?   मी दचकलो कोण बोलतंय हेआजूबाजूला तर कोण नाही.

बहुदा मी स्वतःशीच बरळत होतोपण एकटे असलो की होतं म्हणे अस कधीतरी ऐकलं होतकिंवा सिनेमात पाहिलं असेल पूर्वी !!

मी आपला संवाद सुरुच ठेवला , का ते विचारु नकाजस काही तुला ठाऊक नाहीपूर्ण नारळ दिसतोय ना डोक्यावरमग आता कायगरज आहे ह्या प्रश्नाची

बर चल मग ऎकह्या वर्षी माझा वाढदिवस बऱ्याच बाबतीत वेगळा होताजणू काही वन्स ईन lifetime अनुभव म्हणतो ना आपणअगदी तसा होता !!

म्हणजे एवढं काय वेगळ वाटलं तरी ह्या वेळी , सांग तरी !! 

खर तर चांगल तसं म्हटल तर काहीच नाहीउलट जरा निरुत्साहीच होता मूड!

मी शांत झालो की नुसता असफल प्रयत्न केला हे कळलं नाहीउगाच विचार करीत बसू करु नयेवेळेचा सदुपयोग करावा अश्या मोठ्याबाता मारत असतोस ना नेहमीमग हे काय चाललंय तुझे साहेबा

पण मनावर ताबा असतो का कधी कोणाचाआतून परत मेंदूला सुचना मिळाली आणि सिग्नलला थांबलेली गाडी कशी परत हळुच भोंगावाजवून सुरु होते तशी माझी अवस्था झाली !

हा रे, Sorry हंमाझे पुटपुटणे सुरुच होतेम्हणजे आई नाहीना विश करायला ह्या वर्षी

तू म्हणशील त्यात कायअसा दिवस सगळ्यांच्या जीवनात येतो कधीतरीवाईट आहे खरं , पण कटू सत्य म्हणता येईलमी आपलीस्वतःची समजूत घालत राहिलो उगाच.

अरे हो नानाहीतर गेली कित्येक वर्ष तिचा फोन आला नाही असं झालं नाही कधी ! आपण किती ही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपणबाळच असतोबेस्ट लक तुलाहे तिचे ठरलेले शब्दमला काही वेळा अस जाणवायच तिच्याशी बोलताना की आपली लहानपणाचीछबी अजून ही ती मनात बाळगून आहे की कायबरंजाऊ दे नको त्या आठवणीतू विचारत होतास वाढदिवसाला काय केलंस म्हणून.

मातोश्री मात्र काही केल्या पिच्छा सोडेना माझा ! अरेआता वाढदिवसाला शोक दिवस म्हणून साजरा करणार की काय राव तू

हो नाखरयपण कित्येक दशकांचा सहवासकसा विसरणारआठवणींचे धागे असे सहज तुटण शक्य नाही रेठीक आहे मग होईलसवय हळू हळू तुलानाही का

हो ना करायलाच हवीपण त्या फोन वरील आमच्या संवादाच्या आठवणींची किंमत आता मला जाणवतेयफोन tapping ची सोयअसायला हवी आपल्याकडे!!

बाकी काय मग बोल नाखास काही ! 

खास विचारतोसह्या वर्षी हा कॉवीड virus आहे की special. सगळीकडे धुमाकूळ घातलायआपल्याला हैप्पी बर्थडे म्हणुन कोणीशुभेच्छा दिल्यावर तर त्याला तर सोडाच आपल्याला सुद्द्धा किंचितही  happy feelings  येत नाहीत्याचे वाक्य संपे पर्यंत दोघांनाही  नकळत आजच्या बिकट परिस्थितीची जाणीव होते आणि लगेच विषय बदलतोआणि मग कायदिवस भर दूरध्वनी द्वारे खूप गप्पा टप्पाकेल्या.  इतकी वर्ष झाली तरी अजुनही आपली हितेच्छु मंडळी आहेह्याचा मनाला आनंद होतो

खरी मैत्री काय माहिती आहे का तुला

नाही रे बाबाआज तुझा दिवस आहेआने दो औरमीमला वाटतं नकळत विचारांच्या पतंगाला आणखी ढील देत होतोकाही भाननसल्या सारखातुला माहिती आहे का एक गम्मतजुन्या मैत्री ला सोसिअल मीडिया लागत नाही.

कारण सध्या मला दिसतंय समोर की थोडी खुशी थोडा गम हेच आपल्या सगळ्यांच्या जीवनाच ब्रीद वाक्य आहेकोणीही त्याला अपवादनाही.  दुःख सहन केल्या शिवाय सुखाचा आनंद भोगता येत नाही आणि त्याची गोडी काही वेगळीच लागतेम्हणतात नापुढे बघाअश्या वेळी जुन्या पुराण्या मित्राचा फोने अती मोलाचा वाटतो रे.

पण एक बाब नक्कीच आहेइतका नकारात्मक वातावरणात कधीच साजरा केला नाही मी माझा वाढदिवसचारही दिशांनी नुसत्याअसल्या वाईट बातम्यांचा वर्षाव होतोय आपल्या वरतरी सुद्धा आपण डोकं शांत ठेवुन घरात संपूर्ण वेळ कैद असताना सकारात्मकराहण्याचा प्रयत्न करुयात

वा हे तुझं resolution पटलं मलामग पुढे कायकरशील ना वाढदिवस पुढल्या वर्षी साजरा जोमाने ? 

पुढचा कोण विचार करेल इतकाआहे त्या क्षणात जगून घ्याव सगळ्यांनीआणि होथांबवूयात का आपण आता आपली ही मन कीबातकामं आहेत मलारिकामटेकडा नाही मी!!


अनिल दिवेकर

१७ जुलै २०२१


Comments