वाढदिवस आणि कॉवीड
आपला सगळ्यांचा वाढदिवस दरवर्षी येतोच नाही का , यात काही नवल नाही . सकाळ उजाडली की मित्रांचे , नातेवाईकांचे शुभेच्छा देणारे संदेश आणि दूरध्वनी येण्याची सुरुवात होते आणि आजच्या इन्फॉर्मशन age च्या काळात तर ते आणखीच सरळ सोपे झाले आहे . जी मंडळी social मीडिया वर सदा तत्पर , टेक्नॉ सॅव्ही असतात उनके तो क्या कहने ? त्यांच्या वर , म्हणजे त्यांच्या अकाऊंट मधे तर मित्र मंडळी कडून आपल्या भावना , शुभ संदेश याचा भडीमार होत असावा . खर विचारलत तर मला नेहमी प्रश्ण पडायचा की सगळे वाढदिवस का साजरा करतात . एवढ्या उत्साहाने , काही मंडळी तर अगदी जल्लोष करुन . यात आनंद वाटण्यासारखं काय आहे ? आपण या पृथ्वीतलावर आहोत या वर्षी सुध्दा , अजूनही , याची खुशी असावी , बहुदा . तुम्हाला अगदी खर सांगतो , मी सुध्धा माझ्या मनातलं असलं तत्व ज्ञान , असले विचार आपल्याजवळच ठेवून बरेच वेळा वाढदिवस साजरा